भाग्यविधाता 'ब्रह्मदेव' हा उंच डोंगरी वसे |

सदैव जागृत आणि स्वयंभू श्रध्दास्थान असे ||

नियोजित प्रतिकृती

सध्याच्या पर्यटनयुगात पुरातन देवळारावळांचा वारसा नव्या सांस्कृतिक समृद्धीच्या झळाळीने उजळून निघतो आहे. या पार्श्वभूमीवर श्री ब्रह्मदेव मंदिर व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर यांचे यथोचित नूतनीकरण आणि संवर्धन करण्याचा मह्त्वांकांशी प्रकल्प पूर्णत्वास जात आहे...

आणखी वाचा

श्री देवी जुगाई मंदिर

कोर्ल्याच्या पश्चिम सीमेवर असलेले श्री जुगाई देवीचे पुरातन मंदिर –प्रशस्त आणि गावरहाटीतील प्रमुख देवस्थान– नवरात्रोत्सव, शिमगोत्सव यांसारख्या उत्सवांचे नियोजन इथूनच केले जाते. देवी जुगाई सोबतच कालिकादेवी, पावणादेवी, चौंडेश्वरी देवी, रिध्दी-सिध्दी या देवीही विराजमान आहेत.

आणखी वाचा

ग्रामसंस्कृती

‘पालखीनृत्य’, ’होलिकोत्सव’, ’शिमगोत्सव’, ’भावई’ यांसारखे धार्मिक उत्सव, सण गावकरी मोठया श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे करतात. श्री देवी जुगाई ढोलपथकाने तर मुंबई, इंदौर, दिल्ली याठिकाणी विविध महोत्सवांमध्ये आपली पालखी व ढोलनृत्य कला सादर करून वाहवा मिळवली आहे.

आणखी वाचा

ग्रामपंचायत व शैक्षणिक संस्था

सुसज्ज व प्रशस्त ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांसारख्या सोयी सुविधेमुळे कोर्ले सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची फार मोठी सोय झाली. म्हणूनच इथला नागरिक सुसंस्कृत व सुजाण आहे.

आणखी वाचा
परिसर

परिसर

सुपीक शेतमळे, दक्षिण पूर्वेला गर्द वृक्षराजीने नटलेल्या डोंगररांगा, नारळी–पोफळी, आंबा, काजू यांसारख्या फळबागा, साग, आईन, किंजळ, शेवर, वड, पिंपळ यांसारखे प्रचंड मोठे वृक्ष, उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुख नदी आणि नावाप्रमाणेच निसर्गातून जणु सुरेख कोरून काढलेले देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव-‘कोर्ले’..केवड्याचे बन, देवराई, झाडे-झुडपे, पक्षांचे कुंजन, वनचरांचा मुक्त वावर यांमुळे देवळाचा परिसर मंगल व उदात्त वाटतो..

संकल्प

संकल्प

इतर संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याचदा या गोष्टींचे कायदयाच्या बंधनाने पालन होऊ शकत नाही. त्यांना धार्मिक भावनेची झालर लावल्यास काटेकोरपणे पालन केले जाते. हा मानवी मनाचा गुण हेरुनच कदाचित आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विविध नक्षत्रांसाठी आराध्य वृक्ष निश्चित करून त्यांची लागवड व जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर नक्षत्रवनामध्ये निवडण्यात आलेले वृक्षही दुर्मिळ, मौल्यवान व बहुपयोगी आहेत. त्यांच्या जोपासनेमुळे निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे.

देवालयातील धार्मिक उपासना

देवालयातील धार्मिक उपासना

नित्यपूजा, अभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, महारुद्र, नित्यनैवेद्य या उपासना ब्रह्मदेव मंदिरामध्ये अव्याहतपणे सुरु आहेत.याठिकाणी रोज महानैवेद्य केला जातो. ’श्रीफळ’ म्हणजेच नारळ हाच इथला प्रसाद. भाविकांनी दिलेला प्रत्येक नारळ फोडला जातो व त्याचा प्रसाद भाविकांना दिला जातो. तसेच देवालयामध्ये या उपासना ट्रस्ट मार्फत देणगीमूल्य स्वीकारून करण्यात येतात. देवालयात नियमितपणे पूजा, नैवेद्य व अभिषेक हे कार्यक्रम होत असतात. दर महिन्याला एक ठराविक रक्कम देऊन त्या महिन्याचा नित्यनैवेद्य त्या भक्ताच्या नावाने दाखविला जातो.

ॐ ब्रह्मदेवाय नमः

ॐ वेदान्मने च विद्महे हिरण्य गर्भाय धीमहि |
तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ||