संस्थेबद्दल

ब्रह्मदेव देवालय, कोर्ले




      भारतात श्री ब्रह्मदेवाची मंदिरे दोनच ठिकाणी आहेत. एक राजस्थानमधील पुष्कर तर दुसरे देवगड तालुक्यातील कोर्ले येथे. इथले एकूण वातावरण निर्मळ, निरामय असून भवतापाने पोळलेल्या, ताणतणावांनी गांजल्या मनाला आध्यात्मिक शांती देण्याचे सामर्थ्य या पवित्र वनस्थळीला लाभले आहे, हे निर्विवाद. प्रतिवर्षी हजारो भाविक व पर्यटक भेट देतात. तसेच कौटुंबिक व शैक्षणिक सहलीही आयोजित केल्या जातात. सृष्टीनिरीक्षक इथे वाढत्या संख्येने येत असतात. मंदिराची पूजाअर्चा, रुद्रानुष्ठानादी नित्यकर्मे व देखभाल सुविहितपणे केली जाते. श्रावण महिन्यात तर रुद्रघोषाने इथला अणुरेणु निनादून उठतो. अशा या पुरातन मंदिराचे बांधकाम खूपच जीर्ण झाले होते. म्हणून प्राप्त परिस्थितीचा विचार करून गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन न्यासाची स्थापना केली. ग्रामस्थांनी या कामासाठी आर्थिक स्वरुपात देणगी जमा करण्यास सुरुवात केली. मंदिराचा मुळ ढाचा कायम ठेऊन मंदिराची नव्याने उभारणी करण्याचे काम आता पूर्णत्वास जात आहे. या मंदिराचे आर्कीटेक्ट श्री. योगेश सावंत, कणकवली व ठेकेदार श्री. सत्यवान परब, देवगड यांचे खुप मोलाचे सहकार्य मंदिर उभारण्यास लाभले आहे.

‌‍‍‌‌


श्री ब्रह्मदेव देवालय येथे न्यासामार्फत संपन्न होणारे कार्यक्रम

  "गुढीपाडवा (चैत्र-शुक्ल-प्रतिपदा), अक्षयतृतीया व गुरुपौर्णिमा या दिवशी श्री. ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक केला जातो."

  "श्रावण महिना हा या मंदिरातील खऱ्या अर्थाने उत्सवांचा व धार्मिक कार्यक्रमांचा महिना. प्रत्येक श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दिवसभर ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक सुरु असतो. सायंकाळी महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादासाठी अनेक भाविक देणग्या देत असतात. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल एकादशीपासुन संकष्टी चतुर्थी पर्यंत दोन दिवसांचा ‘महारुद्र अनुष्ठान’ कार्यक्रम संपन्न होतो."

  "वार्षिक शेती हंगामाच्या कामांची सुरुवात श्री. ब्रह्मदेव मंदिरात महानैवेद्य दाखवून केली जाते त्याला ‘समाराधना’ असे म्हणतात."

  "महाशिवरात्रीला भक्तगणांकडून लघुरुद्र, अभिषेक व एकादशणी इ. धार्मिक विधी मोठया भक्तिभावाने केले जातात. या दिवशी भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद दिला जातो. यासाठी अनेक भक्तगण देणगी देत असतात."

  "फाल्गुन महिन्यामध्ये शिमगोत्सवात, श्री. देवी जुगाईची पालखी श्री. भेटीसाठी येते. त्यावेळी दशक्रोशीतील भाविक हा ‘देवभेटीचा सोहळा’ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात."

  "ग्रामस्थ व अन्य ठिकाणाहून येणारे भाविक वर्षातुन एकदातरी, या ठिकाणी आपला 'महानैवेद्य' अर्पण करतात."

  "ब्रह्मदेव मंदिरामध्ये दररोज नित्यपूजा, अभिषेक व नैवेद्य हा कार्यक्रम होत असतो."

  "प्रतिमहिना ठराविक रक्कम देऊन त्या महिन्याचा नित्यनैवेद्य त्या भक्ताच्या नावाने दाखविण्याची व्यवस्था विश्वस्त मंडळाने केली आहे. यासाठी अनेक भाविक देणगी देत असतात."

  "प्रतिमहिना एका सोमवारी (संपूर्ण वर्षभर) एकादशणी करण्यासाठी ठराविक रकमेची देणगी अनेक भाविक देत आहेत ."

 "या व्यतिरिक्त अनेक भाविक विश्वस्त मंडळाकडे देणगी सुपूर्द करून अभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, महारुद्र, महानैवेद्य अशाप्रकारचे धार्मिक विधी करतात".
तरी भाविकांनी विश्वस्त मंडळाशी संपर्क साधावा !

न्यासाचे नाव, कार्यक्षेत्र, उद्देश व ध्येय



श्री ब्रह्मदेव देवालय, कोर्ले   ता. देवगड, जि.सिंधुदुर्ग   नो. क्र. अे.६२० सिंधुदुर्ग
उद्देश व ध्येय :- नैमित्तीक पूजाअर्चा करणे, दिवाबत्ती करणे, वार्षिक उत्सव पुर्वापाररितीप्रमाणे साजरे करणे, देवालयाचा जीर्णोद्धार करणे, आरोग्य सेवा अंतर्गत आर्थिक मदत, शैक्षणिक उपक्रमांतर्गत आर्थिक मदत वगैरे..

विश्वस्त मंडळ



न्यासाचा दैनंदिन कारभार सुरळीत चालविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेने निवडलेल्या ११(अकरा) ग्रामस्थांचे मंडळ असेल त्याची मुदत ५ वर्षे असेल.
नैमित्तीक पूजाअर्चा करणे, दिवाबत्ती करणे, वार्षिक उत्सव पुर्वापाररितीप्रमाणे साजरे करणे, देवालयाचा जीर्णोद्धार करणे, आरोग्य सेवा अंतर्गत आर्थिक मदत, शैक्षणिक उपक्रमांतर्गत आर्थिक मदत वगैरे अशी कामे न्यासामार्फत केली जातात. सध्या या मंदिराचे बांधकाम खूपच जीर्ण झाले आहे. मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागत आहेत. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून ग्रामस्थांनी या मंदिराचं नुतनीकरण आपणा सर्वांच्या सहकार्याने करण्याचे ठरविले आहे. या नुतनीकरणामध्ये मंदिराचा मुळ ढाचा कायम ठेऊन गाभाऱ्याच्या चारही बाजूस प्रशस्त बैठक व्यवस्था, स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रसाधनगृह व अंगण करण्याचे ठरविले आहे.

श्री. सुधीर भास्कर रानडे

अध्यक्ष

कै. श्री. आत्माराम बाबू बेळणेकर

कार्यवाह

श्री. दत्तात्रय रावजी मघाम

कोषाध्यक्ष

श्री.सखाराम सदाशिव घाडी

सदस्य

श्री. नामदेव यशवंत बेळणेकर

सदस्य

श्री. विश्वनाथ वि. खानविलकर

सदस्य

श्री. संतोष शां. जावडेकर

सदस्य

श्री. प्रशांत वसंत पवार

सदस्य

श्री. किशोर श्रीपत शृंगारे

सदस्य

श्री. नितीन प. करंदीकर

सदस्य

श्री. मिलिंद पांडुरंग देसाई

सदस्य

श्री. मधुकर बेळणेकर

सदस्य

संस्थाध्यक्ष मनोगत

      "आपल्या कोर्ले पंचक्रोशीचे आराध्य दैवत स्वयंभू श्री. ब्रह्मदेव ! कोकणच्या भाविक संस्कृतीचे एक नितांतरम्य श्रध्दास्थान. आणि अशा या देवालयाचा संस्थाध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला, म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
      गेली ७-८ वर्ष संस्थाध्यक्ष म्हणून काम करत असताना कार्यकारी मंडळाचे सभासद, ग्रामस्थ व हितचिंतक यांची सतत मिळणारी साथ, त्यांचे प्रोत्साहन, त्यांचा पाठिंबा यामुळे मला काम करण्यासाठी सतत एक नवीन उर्जा मिळत होती.
      आपल्या ब्रह्मदेव मंदिरामध्ये झालेला बदल, त्याचा जीर्णोद्धार, नवनवीन उपक्रम आणि भक्तगणांकडून मिळत असलेला प्रतिसाद पहाता आपण सर्व मिळून या देवालयाचा एक उत्तम ‘धार्मिक पर्यटन स्थळ’ व निसर्गसंपन्न जैवविविधतेने नटलेले समृद्ध ठिकाण बनवू असा मला विश्वास वाटतो.
      श्री. ब्रह्मदेव देवालयाच्या जीर्णोद्धारासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या मोलाच्या प्रतिसादामुळेच देवालय ट्रस्ट पुढे जाऊ शकले याची कार्यकारी मंडळाला कृतज्ञतापूर्वक जाणीव आहे.
      आपणा सर्वांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच श्री ब्रह्मदेव चरणी प्रार्थना !"