आपल्या कोर्ले पंचक्रोशीचे आराध्य दैवत स्वयंभू ‘श्री ब्रह्मदेव’. भारतात श्री. ब्रह्मदेवाची मंदिरे दोनच ठिकाणी आहेत. एक राजस्थानमधील ‘पुष्कर’ तर दुसरे देवगड तालुक्यातील कोर्ले येथे. सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम काही दानशूर भक्तांनी केले होते. पण नंतरच्या काळात मंदिराचे लाकडी बांधकाम वाळवी मुळे जीर्ण होऊ लागले होते. मंदिरात दर्शनासाठी तर भक्तांच्या रांगा लागत होत्या. जागा अपुरी पडू लागली होती. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून ग्रामस्थांनी या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. या नूतनीकरणामध्ये मंदिराचा मुळ ढाचा कायम ठेऊन मोठा गाभारा, चारही बाजूंना प्रशस्त बैठक व्यवस्था, स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रसाधनगृह, भक्तनिवास व मंदिर परिसराचे सुशोभीकरण याचा प्रस्ताव आहे.
      या संपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी या कामासाठी आर्थिक स्वरुपात देणगी जमा करून मंदिर बांधकाम पूर्णत्वास नेले आहे. अजूनही स्वतंत्र स्वयंपाकघर, भक्तनिवास, मंदिर परिसर सुशोभीकरण यांसारखी कामे शिल्लक आहेत. तरी आपण स्वतः, आपले नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांकडून जास्तीत जास्त देणगी जमा करून या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी. जमा होणाऱ्या देणगीची अधिकृत पावती देण्यात येईल. तरी आपण या ईश्वरी कार्यात जास्तीत जास्त सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपल्या सर्वांच्या नोकरी व्यवसायात प्रगती होवो !
सर्वांना चांगले आरोग्य लाभो !
हीच श्री ब्रह्मदेव चरणी प्रार्थना...
टिप -
चेक / डी.डी. श्री ब्रह्मदेव देवालय कोर्ले (जीर्णोद्धार) यांच्या नावे काढावेत.
देणगीसाठी बँक खात्याची माहिती
खाते क्र.-२०१७१४१९७८७
बँकेचे नाव-बँक ऑफ महाराष्ट्र,खारेपाटण
आय.एफ.इस.सी कोड - MAHB0000274
संपर्क
श्री. सुधीर भास्कर रानडे –अध्यक्ष
०२३६४-२४४७५२,९२२५६९६९७०
श्री .नितीन प. करंदीकर
०२३६४-२४४७५०,९४२२५९०५३३
आपण स्वतः, आपले नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांकडून जास्तीत जास्त देणगी जमा करून या कामासाठी सढळ हस्ते मदत करावी. आमच्याशी संपर्क साधून तुम्ही देणगी जमा करू शकता.
श्री ब्रह्मदेव देवालयामध्ये खालील प्रकारच्या धार्मिक उपासना ट्रस्ट मार्फत देणगी मूल्य स्वीकारून करण्यात येतात .